Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

schedule05 Oct 26 person by visibility 96 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज  वन प्रतिनिधी : पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयान्वये या निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  निवडणुकीतील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ब नुसार भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही विशेष नैमित्तिक रजा खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना लागू होणार नाही. या निवडणुकीकरिता  खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर, शिक्षक मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली -उगले यांनी कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes