गोकुळची आरोग्य सेवा-सीपीआरमध्ये मोफत दूध वाटप, रुग्णासह नातेवाईकांना लाभ !
schedule01 Jun 24 person by visibility 392 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) नेहमी विविध सामजिक उपक्रम राबवित असतो. त्या अनुषंगाने एक जून, जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्ण,नातेवाईक व कर्मचाऱ्यांना मोफत ‘गोकुळ फ्लेव्हर मिल्क’ दुधाचे वाटप करण्यात आले. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व छत्रपती शाहू वैद्य.महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, दूध हे आपल्या जीवनाचा आणि आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. दूधाचा मानवी जीवनाशी अगदी प्राचीन कालखंडापासून संबंध असून मनुष्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जीवनातील प्रत्येक दिवसाची सुरुवात दुधाच्या पोषणाने केली पाहिजे.
जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे म्हैस दूध वाढ कार्यक्रमअंतर्गत रूट सुपरवायझर, संकलन अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर,कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, सी.पी.आरचे अधीक्षक डॉ. शिशिर निरगुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अभिषेक पाटील, सीपीआरमधील बंटी सावंत उपस्थित होते.