Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभाजज डडहुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आठ ऑगस्टला क्रांतिज्योत मिरवणूक डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकरभारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाहीक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शितहॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे " संतांचे संगती " निरुपणास प्रारंभ 

जाहिरात

 

हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आठ ऑगस्टला क्रांतिज्योत मिरवणूक

schedule06 Aug 26 person by visibility 22 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे शनिवारी, आठ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांतिज्योतीची आयोजन केले आहे. मंगळवार पेठ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (मिरजकर तिकटी ) येथे सायंकाळी ५.३० वाजता क्रांतिज्योतीचे प्रज्वलन होईल. महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी, उपाध्यक्ष किशोर यादव, कार्याध्यक्ष केदार पायमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडले अशा थोर क्रांतिकारकांची आठवण  राहावी यासाठी संस्थेतर्फे १९७८ पासून क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला क्रांतिज्योत काढली जाते. गेली ४८ वर्षे क्रांतिज्योतीची परंपरा आहे. क्रांतिज्योत मिरवणूक बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, देवैज्ञ बोर्डिंग मार्गे पुन्हा मिरजकर तिकटी येथील हुतात्मा स्तंभपर्यंत काढण्यात येते. वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताने मिरवणुकीची सांगता होते. पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव मुसा शेख, खजानिस प्रशांत डकरे, अॅड. विनायक मोहिते पाटील, युवराज तेली, कार्यकारिणी सदस्य सतीश पोवार, दिपक म्हेतर, धनाजी घोरपडे आदी उपस्थित होते.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes