विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य
schedule28 Jul 26 person by visibility 12 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सभासद कल्याण योजनेतून मयत सभासदांच्या वारसांना चार लाख ७९ हजार १६५ रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. संस्थेचे सभासद दिवंगत सुरगोंडा आनंदा पाटील (शाखा न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज ) यांच्या वारसांना विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते अर्थसहाय्य केले.
‘एखाद्या सेवकाच्या किंवा सभासदाच्या आकस्मित निधनामुळे होणारे कुटुंबाचे नुकसान हे मोठे असते, अशावेळी एखादे छोटेसे आर्थिक सहकार्यही त्यांच्या कुटुंबांना दुःखामध्ये सावरणेसाठी महत्त्वाचे असते आणि अशावेळी पतसंस्थेने सहकार्य केल्याने संस्थेच्या या योजनेस सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. पतसंस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमधे सर्व सभासदांनी सहभाग घेऊन भविष्यामधील कुटुंबाचा संभाव्य आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न करावा’ असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष साळुंखे यांनी केले.
पतसंस्थेचे सभासद सुरगोंडा आनंदा पाटील यांनी पतसंस्थेकडे सभासद कल्याण ठेव योजनेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांचे निधन झाले. त्यांनी संस्थेकडे कर्ज घेते वेळी या योजनेत भाग घेतल्यामुळे, त्यांच्या वारसांना कल्याण ठेव योजनेतून चार लाख इतक्या रकमेचे अर्थसहाय्य उपलब्ध झाले. त्यांचे संस्थेकडील शेअर्स व अन्य जमा रक्कम वारसांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन हितेंद्र सूर्याजीराव साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, व्यवस्थापक कमिटी सदस्य व कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, शिक्षणसंस्थेचे सहसचिव सिताराम गवळी, सातारा विभाग प्रमुख शशिकांत काटे व पुणे विभाग प्रमुखसाकोरे, पतसंस्थेचे सेक्रेटरी संपत वेटाळे उपस्थित होते