अमल महाडिक यांच्या प्रचार दौऱ्याला शेतकरी सभासदांचा वाढता प्रतिसाद
schedule26 Mar 23 person by visibility 1335 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रचार दोऱ्याला सभासद शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील गावांना महाडिख हे भेटी देऊन सभासदांशी संपर्क साधत आहेत.
एप्रिल महिन्यामध्ये राजाराम कारखान्याची निवडणूक होत आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व माजी आमदार अमल महाडिक करत आहेत. तर विरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे करत आहेत. सत्ताधारी व विरोधी आघाडीने कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदापर्यंत पोहोचून आपापली भूमिका मांडत आहेत. कारखान्यावर गेली अनेक वर्ष माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. या कालावधीत ऊस उत्पादक शेतकरी सभासदासाठी कारखान्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात आले आहेत. सभासद हिताला प्राधान्य देऊन कामकाज केल्याचे माजी आमदार अमल महाडिक हे प्रचार दौऱ्यात सभासदांना पटवून देत आहेत.
राजाराम कारखान्याच्या माध्यमातून सभासदांसाठी मोबाईल ॲप, एसएमएस यंत्रणा, पाणीपुरवठा संस्था कार्यान्वित करणे, सभासदासाठी विमा पॉलिसी अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत.माजी आमदार अमल महाडिक यांच्या गावनिहाय प्रचार दौऱ्याविषयी सभासदांकडून समाधान व्यक्त होत आहे. सभासदांना प्रत्यक्ष भेटून कामकाजाविषयी चर्चा, भविष्यकालीन योजनेविषयी माहिती सांगितले जाते.