Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वाढदिवसाला अनोखा उपक्रम, बालकल्याण संकुलातील मुलांसाठी खास शोजिल्हा परिषदेतर्फे दर शुक्रवारी सायकल डे, पदाधिकारीही करणार बसने प्रवाससामान्य माणसांनी प्रवास - खर्च कमी करायचा, भाजपचे मंत्री - नेते काय त्याग करणार ? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सवालशुक्रवारपासून तीन दिवसीय परिस सेंद्रिय खत महोत्सव मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणारजनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदली  रजा मंजूर करावीई चलन दंड माफीचा सरकारला विसर, कोल्हापुरात प्रदीप राठोंडाचे आमरण उपोषणमहापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारचे विविध प्रकल्प - राजेश क्षीरसागरविद्यापीठीय - महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यात

जाहिरात

 

जिल्हा परिषदेतर्फे दर शुक्रवारी सायकल डे, पदाधिकारीही करणार बसने प्रवास

schedule13 May 26 person by visibility 123 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा परिषदेने दर शुक्रवारी सायकल डे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात पदाधिकारी सहभागी होणार आहेत.  ज्यांना शक्य आहे, त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतंर्गत बसेसचा वापर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी केले आहे. जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयापासून जवळच्या अंतरावर आहेत, त्यांनी चालत कार्यालयात यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रत्येक शुक्रवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीकडील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे .जिल्हा परिषदेकडील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही बस व सायकलींचा वापर करावा. असे आवाहन अध्यक्षा खोत यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच देशवासियांना उद्देशून भाषण करताना काटकसरीचे आवाहन केले आहे. इंधन बचतीचा संदेश देताना पेट्रोल व डिझेलचा कमीत कमी वापर करावा असे आवाहन मोदी यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेने दर शुक्रवारी सायकल, बस अथवा चालत कार्यालयात येण्याचा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.

…………………………………………….

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes