Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदली  रजा मंजूर करावीई चलन दंड माफीचा सरकारला विसर, कोल्हापुरात प्रदीप राठोंडाचे आमरण उपोषणमहापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारचे विविध प्रकल्प - राजेश क्षीरसागरविद्यापीठीय - महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यातदोन वर्षे झाले, शंभर कोटीचा रस्ता प्रकल्प अद्याप अपूर्णच ! आपच्या कार्यकर्त्यांची आयुक्तांकडे तक्रार ! ! एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे !  विकासकामांचा, प्रशासकीय यंत्रणेचा घेणार आढावा  !! चित्रकर्मी क्रिकेट लीगला प्रारंभ, अभिनेत्री सुरेखा कुडचींची उपस्थिती३१ मेपर्यंत थकबाकी भरा, अन्यथा एक जूनपासून दुकानगाळे सील - आयुक्‍त राजेंद्र भारुड कुलगुरुपदासाठी चौदा मे रोजी अंतिम मुलाखती ! डॉ. पी. एस. पाटील, आर. के. कामत, ज्योती जाधव यांचा समावेश !!

जाहिरात

 

जनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदली  रजा मंजूर करावी

schedule13 May 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील शिक्षक हे जनगणना 2027 चे  प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून  मे व जून महिन्यांच्या सुट्टीच्या कालावधीत काम  करत आहेत . या सुट्टीच्या कालावधीमध्ये  त्यानी जितके दिवस जनगणनेचे काम केले असेल तितके दिवसांची बदली रजा त्यांना मंजूर करावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडे केली .यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते
 2011 मध्ये अशा प्रकारची रजा देय केली आहे.त्यांनी जितके दिवस काम केले असेल तेवढ्या दिवसाची रजा यांच्या अर्जित रजा खात्यास जमा केलेली आहे .चालू जनगणना 2027 मध्येही जनगणना कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या खात्यात त्यांनी जितके दिवस काम केले असेल तितक्या दिवसाची रजा मंजूर करून ती जमा करण्याची कार्यवाही ठेवावी .व तशा प्रकारचे निर्देश स्थानिक शिक्षणाधिकारी व जिल्हा जनगणना अधिकारी यांना द्यावेत अशी मागणी केली. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष कुमार पाटील ,शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे ,पतसंस्थेचे संचालक सर्जेराव नाईक राज्य शिक्षकेतर प्रमुख जे .डी .मोराळे, डॉ . भानुदास कुलाळ , मराठवाडा खाजगी शाळा  संघटनेचे अध्यक्ष रवींद्र देशपांडे व अंबादास नन्नवरे हे उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes