Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारचे विविध प्रकल्प - राजेश क्षीरसागरविद्यापीठीय - महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यातदोन वर्षे झाले, शंभर कोटीचा रस्ता प्रकल्प अद्याप अपूर्णच ! आपच्या कार्यकर्त्यांची आयुक्तांकडे तक्रार ! ! एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे !  विकासकामांचा, प्रशासकीय यंत्रणेचा घेणार आढावा  !! चित्रकर्मी क्रिकेट लीगला प्रारंभ, अभिनेत्री सुरेखा कुडचींची उपस्थिती३१ मेपर्यंत थकबाकी भरा, अन्यथा एक जूनपासून दुकानगाळे सील - आयुक्‍त राजेंद्र भारुड कुलगुरुपदासाठी चौदा मे रोजी अंतिम मुलाखती ! डॉ. पी. एस. पाटील, आर. के. कामत, ज्योती जाधव यांचा समावेश !!आनंदोत्सव शिक्षण विभागाने देशात अव्वल स्थान पटकाविल्याचा…संकल्प उत्कर्ष श्रेणी प्राप्तीचाभारतीय जनरल कामगार सेनेतर्फे निदर्शने, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

जाहिरात

 

महापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!

schedule12 May 26 person by visibility 25 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  एलिक्झा पार्कच्या पिछाडीस कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावावर असणारी एकूण ७९४६.२३ चौरस मीटर इतकी जागा आहे. या खुल्या जागेची रेडीरेकनर प्रमाणे २१ कोटी रुपये किंमत होते तसेच बाजार भावाप्रमाणे या जागेची जवळजवळ ६० ते ७० कोटी रुपये किंमत होते. परंतु दुर्दैवाने कोल्हापूर महापालिकेच्या या जागेवर अनेक फोर व्हीलर गाड्या मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पद्धतीने पार्किंग करण्यात येत आहेत. ही जागा अतिशय मोक्याची आहे. कोल्हापूर महापालिकेला सोन्याचा दर मिळणार असणाऱ्या जागेचा लाभ घेता येत नाही आहे हे दुर्दैव आहे. ’अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक विजय जाधव यांनी आयुक्त राजेंद्र भारुड यांचे या जागेकडे लक्ष वेधले.

जाधव यांनी, आयुक्त भारुड यांची भेट घेऊन या विषयाकडे लक्ष वेधले. ही जागा बॅडमिंटन कोर्टसाठी प्रस्तावित असल्याचे समजते परंतु ही जागा फक्त बॅडमिंटन कोर्टसाठी न देता तेथील सर्व सामान्य नागरिकांना सर्व सोयींयुक्त उपयोग होईल अशा पद्धतीने वापरात आणावी. या जागेवर कमर्शियल बिल्डींग उभारून महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी असेही ते म्हणाले. यावर भारुड यांनी या जागे संदर्भात माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. या प्रस्तावाला मनपाचे उत्पन वाढण्याच्या दृष्टीकोनातून सकारात्मक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर त्या ठिकाणी होत असलेले मोठ्या गाड्यांचे अतिक्रमण तत्काळ काढण्यास व जागा स्वच्छ करून घेण्याची सूचना करू असे सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes