Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सत्तेचा घटक असतानाही शिक्षकांसाठी भांडलो, महाविकास आघाडीच्या कालावधीत जयंत आसगावकरांनी कुठले प्रश्न सोडवले ? कौस्तुभ गावडेंचा सवालकेआयटीच्या २६ विद्यार्थ्यांना टाटा पॉवरमध्ये ७ लाखांचे पॅकेजना रस्ते - ना गटारसाठी, आमदार फंडाचा निधी शाळांसाठी ! पाच जिल्ह्यातील शाळांना सात हजाराहून अधिक शैक्षणिक साहित्य वाटप ! !पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचा आज प्रचार मेळावाउद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृ‌शोककोल्हापुरातील इंडस्ट्रीजसाठी महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्यासोबत बैठक – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसीएचबी प्राध्यापकांची मानधनवाढ, सेवास्थैर्य, अकरा महिन्याच्या नियुक्तीसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करणारमहायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार, कोल्हापुरातील मेळाव्यात निर्धारठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळला

जाहिरात

 

सत्तेचा घटक असतानाही शिक्षकांसाठी भांडलो, महाविकास आघाडीच्या कालावधीत जयंत आसगावकरांनी कुठले प्रश्न सोडवले ? कौस्तुभ गावडेंचा सवाल

schedule15 Oct 26 person by visibility 47 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी ::: ‘ महायुती सरकारमधील सत्तेचा एक घटक असतानाही शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रशासनासोबत संघर्ष केला. शिक्षण उपसंचालक कार्यालयाला ठाळे ठोकले…शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. याउलट महाविकास आघाडीचे सरकार असताना शिक्षक आमदार म्हणून प्रा. जयंत आसगावकरांनी कुठले प्रश्न सोडविले. काँग्रेसकडे शिक्षण खाते होते, जुनी पेन्शन योजनेचा विषय का सोडविला नाही.’असा थेट सवाल पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी केला.

सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची धामधूम सुरू आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातही चुरस पाहावयास मिळत आहे. उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून भूमिका मांडत आहेत. महायुतीचे उमेदवार गावडे यांनी कोल्हापूर शहरातील विविध शैक्षणिक संस्था, संस्थाचालक,शिक्षक यांच्याशी संवाद साधला. प्रत्यक्ष गाठीभेटी घेत निवडून देण्याचे आवाहन केले.

‘शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा मला कुटुंबापासून मिळाला आहे. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या विचारकार्याचा वारसा पुढे चालविण्याचा आपला प्रयत्न आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. जुनी पेन्शन योजना, टीईटी परीक्षेची सक्ती रद्द करावी, अन्यायी संचमान्यतेचा निर्णय मागे घ्यावा अशा विविध विषयासाठी प्रशासन आणि सरकारदरबारी पाठपुरावा केला. शिक्षकांचा मोर्चा असो की आंदोलने…प्रत्येक ठिकाणी आघाडीवर राहून शिक्षकांना बळ दिले.’असे गावडे यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा सुरू असतो. शिक्षकांना न्याय देण्याची आपली भूमिका आहे.असे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक आमदार म्हणून प्रा. जयंत आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षात शिक्षकांच्या कोणकोणत्या प्रश्नांची सोडवणूक केली. प्रारंभीच्या कालावधीत तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. शिक्षण खात्याचे मंत्री काँग्रेसचे होते. त्या काळात आमदार आसगावकर यांनी शिक्षकांचे प्रश्न का सोडविले नाहीत.जुनी पेन्शन योजनेचा विषय का मार्गी लावला नाही.’‘असा सवाल गावडे यांनी विचारला.

…………………………..

‘ शिक्षक आमदार म्हणून गेल्या सहा वर्षात मतदारसंघातील प्रत्येक शाळेला न्याय देण्याची भूमिका ठेवली. शिक्षकांचे विविध विषय जिल्हास्तरापासून विभागीय पातळीपर्यंत हाताळले. सभागृहात शाळा, शिक्षक आणि शिक्षण वाचवा संबंधी आवाज उठविला. जुनी पेन्शन योजनेसाठी पाठपुरावा केला. जुन्या पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरातून शिक्षकांची एकजुटीची मोट बांधली. विधीमंडळाबरोबरच रस्त्यावरच्या लढाईतही भाग घेतला. शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गासाठी झटत आहे.’

  • प्रा. जयंत आसगावकर, महाविकास आघाडीचे उमेदवार पुणे शिक्षक मतदारसंघ

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes