Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गग डडना रस्ते - ना गटारसाठी, आमदार फंडाचा निधी शाळांसाठी ! पाच जिल्ह्यातील शाळांना सात हजाराहून अधिक शैक्षणिक साहित्य वाटप ! !पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचा आज प्रचार मेळावाउद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृ‌शोककोल्हापुरातील इंडस्ट्रीजसाठी महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्यासोबत बैठक – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसीएचबी प्राध्यापकांची मानधनवाढ, सेवास्थैर्य, अकरा महिन्याच्या नियुक्तीसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करणारमहायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार, कोल्हापुरातील मेळाव्यात निर्धारठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रम

जाहिरात

 

ना रस्ते - ना गटारसाठी, आमदार फंडाचा निधी शाळांसाठी ! पाच जिल्ह्यातील शाळांना सात हजाराहून अधिक शैक्षणिक साहित्य वाटप ! !

schedule15 Oct 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघ हा मोठा. पाच जिल्हयांचा. मतदारसंघातील शाळांची संख्या ही मोठी. या शाळांच्या गरजा ओळखून शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी आमदार फंडातून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर या पाच जिल्हयात मिळून ७११८ शैक्षणिक साहित्य वाटप केले. शिक्षक आमदार म्हणून काम करताना, पाच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. पक्ष, गटतट असा कोणताही विचार न करता शिक्षकांचे प्रतिनिधी या नात्याने शाळांना मदत केली असल्याचे आमदार आसगावकर यांनी सांगितले.

दरवर्षी शैक्षणिक कार्य पाच कोटी रुपयांचा आमदार फंड मिळतो. हा फंड त्यांनी, रस्ते गटारी यासाठी न वापरता तो फक्त शाळेसाठी वापरायचा हे आमदार आसगावकर यांनी ठरविले. आमदार झाल्यापासून ते पहिल्या वर्षापासून त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यास सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना ९९५ प्रिंटर व स्मार्ट टीव्ही ८००, सांगली जिल्ह्यात ६४० प्रिंटर व ३३२ शाळांना स्मार्ट टी.व्ही, सातारा जिल्ह्यात ८७३ प्रिंटर ३६५ शाळांना स्मार्ट टीव्ही आण सोलापूर जिल्ह्यात ६४७ प्रिंटर व २४८ शाळांना स्मार्ट टीव्ही वाटप केले. पुणे जिल्ह्यात १३६४ शाळांना प्रिंटरव ३६० शाळांना स्मार्ट टीव्ही दिले आहत.

शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करताना शाळांना शैक्षणिक साहित्य वाटपाला प्राधान्य दिले. यामध्ये पक्षीय राजकारण केले नाही. शिक्षक आमदार म्हणून साऱ्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली असे आमदार आसगावकर यांनी सांगितले. शिक्षक आमदार फंडातून आमदार आसगावकर यांनी मदारसंघातील शाळांना शैक्षणिक साहित्य देण्याचे काम सातत्याने केले. पहिल्या टप्प्यात ज्या शाळांना शैक्षणिक साहित्य मिळाले नव्हते त्या शाळांना दुसऱ्या टप्प्यात शैक्षणिक साहित्य वाटप केले. शिक्षक मतदारसंघातील उमदेवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या शाळेसाठीही त्यांनी शैक्षणिक साहित्य दिले होते. दरम्यान माजी आमदार सावंत यांनी ते साहित्य घेतले नाही. आसगावकर यांनी मतदारसंघातील शाळांना शैक्षणिक साहित् वाटप करताना कोल्हापुरातील वेतन पथक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाही प्रिंटर प्रदान करत मदतीचा हात दिला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes