Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ना रस्ते - ना गटारसाठी, आमदार फंडाचा निधी शाळांसाठी ! पाच जिल्ह्यातील शाळांना सात हजाराहून अधिक शैक्षणिक साहित्य वाटप ! !पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचा आज प्रचार मेळावाउद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृ‌शोककोल्हापुरातील इंडस्ट्रीजसाठी महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्यासोबत बैठक – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसीएचबी प्राध्यापकांची मानधनवाढ, सेवास्थैर्य, अकरा महिन्याच्या नियुक्तीसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करणारमहायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार, कोल्हापुरातील मेळाव्यात निर्धारठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटील

जाहिरात

 

पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचा आज प्रचार मेळावा

schedule15 Oct 26 person by visibility 17 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (15 ऑक्टोबर 2026) कोल्हापुरात शिवसेनेचा ठाकरे पक्षातर्फे मेळावा आयोजित केला आहे. नेते विनायक राऊत यांच्यासह शिवसेना वरिष्ठ नेत्यांची प्रमुख उपस्थिती आहे. धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता मेळावा होणार आहे.आगामी पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार  सुनील मोदी यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आणि रणनिती निश्चित करण्यासाठी  कोल्हापुरात पदवीधर व शिवसैनिकांचा  मेळावा होत आहे.  या मेळाव्यात पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न, बेरोजगारी, उच्च शिक्षणातील अडचणी यांवर चर्चा होऊन प्रचाराची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.   याप्रसंगी आमदार सुनील प्रभू,  उपनेते  अरुण दुधवडकर, संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख विराज हिंदुराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होत आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes