एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
schedule13 Oct 26 person by visibility 7 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने दिला आहे या शिक्षणाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. बापूसाहेब अडसूळ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली. शिवसेनेतर्फे मंगेश चिमटे यांनी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे जवळपास दहा हजार पाचशे इतके मतदार मतदान प्रक्रियेपासून लांब राहतील असे अडसूळ म्हणाले. महायुती मधील भाजप नेत्यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेशी कोणताही संपर्क साधला नाही. असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला वैभव शेटे, मिलिंद सनदी, रणजीत पाटील, प्रशांत साळुंखे, मनमोहन खोत, अनिल अडसुळे, अतुल साळोखे आदी उपस्थित होते.