+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule18 Mar 24 person by visibility 192 categoryमहानगरपालिका
डीवाय पाटील अभियांत्रिकीतर्फे आयोजन, ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणाचा संदेश
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
 डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व एडवेंचर क्लबच्यावतीने शनिवारी २३ मार्च रोजी 'अर्थ अवर' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी रात्री १ तास विजेची उपकरणे बंद ठेवून वीज बचत व पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.
 प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी सांगितले कि वर्ल्ड वाईड फंड  या जागतिक स्तरावर कार्यरत एन.जी.ओ. कडून जगभरात २३ मार्च रोजी अर्थ अवर'चे आयोजन केले जाते. वाढत्या तापमानामुळे जो असमतोल निर्माण झाला आहे त्याला काही अंशी आळा घालण्यासाठी हा उपक्रम आहे. उपक्रमाचे समन्वयक प्रा- योगेश चौगुले व डीन स्टुडंट्स अफेअर डॉ.राहुल पाटील म्हणाले, शनिवारी कोल्हापूर शहरातील आय. आर. बी. अंतर्गत बल्ब हायमास्ट दिवे व एल.ई.डी. असे ३०,००० हुन अधिक स्ट्रीट लाईट्स सायकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत बंद राहणार आहेत. नागरिकांनीही या कालावधीत लाईट व अनावश्यक विद्युत उपकरणे बंद ठेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे. उर्जाबचत व पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. 
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे  यादिवशी बिंदू चौक येथे रात्री ७.३० वाजता पणत्यांपासून अर्थ अवरचा ६०+ हा लोगो तयार करण्यासाठी सहभागी होतील. नागरिकांनाही यात सहभागी व्हावे. 'अर्थ अवर २०२४' मध्ये कोल्हापूर शहरातील विविध भागातील स्ट्रीट लाईट व घरगुती लाईट शिवाय दिसणाऱ्या शहराची छायाचित्रे nss. dypcet@dypgroup.edu.in या मेल आयडी वर पाठवावीत असे आवाहन संयोजकांनी केले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी , एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश चौगुले, डॉ. राहुल पाटील, श्री तुषार आळवेकर व विद्यार्थी विशेष परिश्रम घेत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे.