भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाखाची देणगी
schedule21 Mar 25 person by visibility 135 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास अधिविभाग प्रमुख तथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. बी. डी. खणे यांनी गुरुवारी (दि. २०) भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. भगवान महावीर अध्यासनाच्या नूतन प्रस्तावित इमारतीसाठी एक लाख रुपयांच्या दातृत्व निधीचा धनादेश डॉ. खणे यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे, डॉ. सचिन खणे, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, डॉ. प्रल्हाद जाखले, अजित शेट्ये, विशाल शेट्ये उपस्थित होते.भगवान महावीर अध्यासनाच्या नूतन इमारत बांधकामास लवकरच सुरुवात होत असून या कार्यासाठी सढळ हस्ते देणगी द्यावी, असे आवाहन डॉ. विजय ककडे यांनी केले आहे.