महापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, रिक्त पदांच्या भरतीसाठी साखळी उपोषण
schedule12 Mar 26 person by visibility 8 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचा सुधारित आकृतीबंध व सेवा नियमावली मंजूर करावी यासाठी काँग्रेस आघाडीने उपोषणाचे अस्त्र उपसले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेसमोर गुरुवारी, बारा मार्च 2026 पासून साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी मागण्यांचे निवेदन महापौर रुपाराणी निकम यांनाही दिले.
महापालिकेमध्ये मोठ्या संख्येने जागा रिक्त झाले आहेत वर्ग श्रेणी एक पासून ते चतुर्थ श्रेणी पर्यंत जवळपास 1700 जागा भरायचे आहेत. या संदर्भात सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही चाल दाखल केले जात आहे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावरती परिणाम होत आहे. तसेच पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यावर मर्यादा पडत आहेत. सरकारने त्वरित महापालिकेचा सुधारित आकृतीबंध व सेवानियमावलीला मंजुरी द्यावी यासाठी काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी 48 तासाची मुदत सरकारकडे दिली होती. मात्र या कालावधीत सरकारकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत असा आक्षेप नोंदवत काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक दुर्वास कदम, अमर समर्थ, उमेश पोवार, सुचिन शेंडे, विनायक फाळके, सुभाष बुचडे, स्वालिया बागवान, दिलशाद मुल्ला, मुस्ताक मलबारी, प्रवीण सोनवणे, स्वाती सचिन कांबळे, दिपाली राजेश घाटगे, विशाल चव्हाण, आदींचा समावेश आहे. माजी महापौर व राष्ट्वादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, माजी नगरसेविका भारती पोवार, माजी नगरसेवक लाला गायकवाड, विजय सूर्यवंशी, शशिकांत पाटील, संपतराव पाटील, रियाज कागदी, अशोक पोवार, सुभाष देसाई आदीनी आंदोलनाला पाठिंबा दिला