कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट वाटप
schedule27 Oct 24 person by visibility 418 categoryशैक्षणिक
*महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते दिवाळी बोनसचे वाटप झाले. ते बीबीए या वर्गाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ आर एस. नाईक, बी बी ए. विभागाच्या समन्वयक डॉ.बेनाडे, प्रा. रोहित खराडे, प्रा प्रभू , प्रा शर्वरी कुंभार उपस्थित होते. प्रा. मेघा महाडिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. तनुजा चौगुले यांनी आभार मानले. यावेळी बीबीए या वर्गातील प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.