Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ४७ वे वार्षिक मॅपकॉन अधिवेशन कोल्हापुरातअपयशाकडे अपयश म्हणून नको त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा –नेमबाज सोनम मस्करकोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत  निवडफुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिकमहाडिक उद्योग समूहाकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदतजयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मांडला कर्तव्यपूर्तीचा लेखाजोखा सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेची, हसन मुश्रीफ - सतेज पाटलांमध्ये गोकुळवरुन राजकीय चिमटेदुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकरजिल्हा बँकेत पुढे काय होणार आहे आता सांगू शकत नाही... सभेत हसन मुश्रीफांचे सूतोवाच

जाहिरात

 

अपयशाकडे अपयश म्हणून नको त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा –नेमबाज सोनम मस्कर

schedule29 Sep 26 person by visibility 47 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘अपयशाकडे अपयश म्हणून पाहू नका, तर त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा.  यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्द आवश्यक आहे.‘हे बोल आहेत, नेमबाज सोनम मस्करचे.

जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारतासाठी रौप्यपदक पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या नेमबाज सोनम मस्करचा राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्याल येथे सत्कार करण्यात आला. जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. 

नेमबाज मस्करने उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधला. ‘आपल्या यशात आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. पालकांचे प्रोत्साहन आणि विश्वास यामुळेच आपली यशस्वी वाटचाल शक्य झाले.’असे तिने नमूद केले.    याप्रसंगी खेळाडू सोनम मस्करच्या वडिलांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे. मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर यश मिळवता येते. सोनमच्या यशामागील प्रवास सांगताना त्यांनी विद्यार्थिनींना आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले.
   

शिक्षणतज्ज्ञ डॉ. पाटील यांनी सोनम मस्कर यांच्याशी संवाद साधत त्यांच्या यशस्वी क्रीडा  प्रवासातून केवळ विद्यार्थिनींनीच नव्हे तर पालकांनी देखील प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. योग्य मार्गदर्शन उत्कृष्ट सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्या तर सोनम आणि स्वप्निल कुसाळे यांच्यासारखे अनेक विजेते कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण होतील असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले..शहीद महाविद्यालयातून सोनमसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडाव्यात, यासाठी आगामी काळात ‘शहीद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ च्या माध्यमातून कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.  प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले.  प्रा. तेजस्विनी परबकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. दिग्विजय कुंभार, प्रा.विशालसिंह कांबळे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes