Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोलागोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशराज्यपालांच्यासोबत डॉ संजय डी. पाटलांचा संवाद ! कृषी, साखर उद्योग, दूध व्यवसाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा !!पदवीधरांचे रोजगार - आर्थिक प्रश्न घेऊन प्रा. एन. डी. चौगले पदवीधर निवडणुकीच्या मैदानातराज्यपालांनी साधला कोल्हापुरात मान्यवरांशी संवाद ! असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ४७ वे वार्षिक मॅपकॉन अधिवेशन कोल्हापुरातअपयशाकडे अपयश म्हणून नको त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा –नेमबाज सोनम मस्करकोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत  निवडफुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

राज्यपालांच्यासोबत डॉ संजय डी. पाटलांचा संवाद ! कृषी, साखर उद्योग, दूध व्यवसाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा !!

schedule29 Sep 26 person by visibility 13 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी, मंगळवारी २९ सप्टेंबर २०२६ कोल्हापूरच्या दौऱ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींचा भेटीमध्ये समावेश होता. यावेळी कृषी, उद्योग, व्यवसाय आणि वास्तुकला क्षेत्र, वैद्यकीय, सनदी लेखा, विधी, कला, क्रीडा, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा समावेश होता. प्रत्येकाने विविध क्षेत्रासंबंधी माहिती दिली. या भेटीत, राज्यपालांनी, पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर कोल्हापूर फेस्टिव्हल सुरू झाला पाहिजे अशी सूचना केली.

या भेटीतंर्गत डॉ. डी.वाय. पाटील ग्रुपचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांचीही राज्यपालांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली.साखर उद्योग व त्यासमोरील अडचणी, दुग्ध व्यवसायातील संधी व सध्यस्थिती, कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने अणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी डॉ. पाटील यांनी विविध मुद्दे मांडले. तसेच काही दिवसापूर्वी राज्यपालांच्या हस्ते, डॉ. संजय डी. पाटील यांना कृषीरत्न या पुरस्कारांनी गौरविले होते. या भेटीत डॉ. पाटील यांनी, पुरस्कार सोहळा समारंभाच्या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा  राज्यपालांनी कृषी क्षेत्रातील नवीन प्रयोगांची माहिती घेतली.

कोल्हापूर जिल्ह्यात साखर उद्योग मोठा आहे. जवळपास दीडशे लाख मेट्रिक टनाहून अधिक ऊस गाळप होते. दहा ते बारा हजार कोटीचा हा व्यवसाय आहे. शेतीसह रोजगार, वाहतूक, बाजारपेठ अशा विविध घटकांशी निगडीत हा उद्योग आहे. कोल्हापुरात उतारा चांगला आहे. कोल्हापुरात उत्तम प्रतीच्या साखरेची निर्मिती होते. कोल्हापुरातील दुधाला वेगळी चव आहे. गोकुळ, वारणा यासह अन्य दूध संघाकडून रोज लाखो लिटर दूध संकलित होते. दूध व दुग्धजन्य पदार्थातून वार्षिक चार ते पाच हजार कोटीची उलाढाल आहे.साखर उद्योग, दुग्ध व्यवसायाला आणखी बळकटी मिळण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून पाठबळ आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात व माफक दरात वीज पुरवठा आवश्यक आहे. सोलर प्रकल्पासाठी अनुदान आहे, पंरतु सोलर प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी उदभवत आहेत. नदीकाठावरील शेतामध्ये सोलर प्रकल्प उभारणी जिकिरीचे आहे हे त्यांनी निदर्शनास आणले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes