Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्यपालांनी साधला मान्यवरांशी संवाद ! उद्योग, शेती,आरोग्य, क्रीडा क्षेत्राची चर्चाअसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ४७ वे वार्षिक मॅपकॉन अधिवेशन कोल्हापुरातअपयशाकडे अपयश म्हणून नको त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा –नेमबाज सोनम मस्करकोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत  निवडफुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिकमहाडिक उद्योग समूहाकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदतजयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मांडला कर्तव्यपूर्तीचा लेखाजोखा सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेची, हसन मुश्रीफ - सतेज पाटलांमध्ये गोकुळवरुन राजकीय चिमटेदुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकर

जाहिरात

 

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ४७ वे वार्षिक मॅपकॉन अधिवेशन कोल्हापुरात

schedule29 Sep 26 person by visibility 16 categoryआरोग्य

महाराष्ट्र  न्यूज वन : इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट महाराष्ट्र चॅप्टरचे ४७ वे वार्षिक अधिवेशन ‘मॅपकॉन २०२६’ यावर्षी कोल्हापूरमध्ये होता आहे.  डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागातर्फे या २ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत हॉटेल सयाजी येथे या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पॅथॉलॉजी विभागाप्रमुख आणि संयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ सुचिता देशमुख, सचिव डॉ. आर. एस. पाटील व खजिनदार डॉ. आर. एम. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 ‘नेक्सट जनरेशन पॅथॉलॉजी' या थीमवर या निमित्ताने प्रथमच 'हरित परिषदे'चे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, डिजिटल पॅथॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स  आणि प्रिसिजन मेडिसिन या भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शुक्रवार २ ऑक्टोबर  रोजी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे,  उपाध्यक्ष डॉ. राजीव राव, सचिव डॉ. चंद्रशेखर भाले, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले,  मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत महाराष्ट्रासह देशभरातून ६०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर, संशोधक, आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

 'मॅपकॉन’च्या इतिहासात प्रथमच ही परिषद 'ग्रीन कॉन्फरन्स' म्हणून आयोजित केली जात आहे. यामध्ये  डिजिटल ॲब्स्ट्रॅक्ट बुक, ई-प्रमाणपत्रे,  क्युआर कोडद्वारे नोंदणी केली जाणार आहे. प्लास्टिक बाटल्या आणि फ्लेक्स बॅनरचा वापर पूर्णपणे टाळून सीड-पेपर बॅग, ज्यूट बॅगचा वापर केला जाईल. कागद वाचवण्यासाठी डिजिटल पोस्टर सादरीकरण, प्रत्येक नोंदणीसाठी एक वृक्ष लागवड असे उपक्रम राबवले जाणार आहेत. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes