कोल्हापूरच्या ३४ विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत यश
schedule03 Nov 25 person by visibility 89 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परिक्षेत कोल्हापूर मधील २४९ विद्यार्थ्यांमधून ३४ विद्यार्थी सीए झाले. यापैकी कोल्हापूर विभागातून आसिम सादिक मेमन यांनी प्रथम क्रमांक, अभिमान गुरुबाळ माळी यांनी दुसरा क्रमांक, ऋतुराज विनायक दाबाडे यांनी तिसरा क्रमांक तर सुष्मिता सूर्यकांत काटकर यांनी चौथा क्रमांक मिळवला. याचबरोबर चैत्रा राघवेंद्र मुजुमदार, श्रीकांत अनिल महाजन, आकांक्षा कृष्णा पाटील, प्रथमेश श्रीनिवास गोगवेकर, ऋषिकेश अरुण पोवार, नमिता दिपक गाडवे, पूनम सागर उपाध्ये, रसिका मोहन पाटील, अपूर्व रत्नाकर हजारे, दर्शनी संतोष तोडकर, साक्षी श्रीकांत झंवर, दिगंबर बापूसाहेब पाटील, जान्हवी कृष्णाजी करमरकर, ओंकार संतोष सामंत, आदित्य रमाकांत काजरेकर, राजकुमार मसवडे, श्यामसुंदर मालू, श्रुती हरीशचंद्र गाट, मानसी गुरूप्पा कर्पट्टी, ज्योतिबा विठ्ठल पाटील, यश प्रताप पाटील, प्रियांका सावंत, ईशा शेखर गाटे, जान्हवी संजय पावसकर, संजना अनिल दरयानी, मिथ गांधी, सूरज पांडुरंग पाटील, बिपाशा शेख, पूजा लटकन आणि तुषार सुभाष घराळ हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले. सीएकोर्स बद्दल अधिक माहिती साठी दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया चे कोल्हापूर शाखेचे ऑफिस आयसीएआय भवन, दाभोळकर कॉर्नर येथे संपर्क साधावा असे आवाहन आयसीआय कोल्हापूर शाखेचे थ्अध्यक्ष नितीन हरगुडे यांनी केले आहे.