महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राचार्य डॉ. डी. डी. मगदूम यांनी लिहिलेल्या प्रबंधावर आधारित ‘ समीक्षक प्रा. रा. श्री. जोग : एक चिकित्सक अभ्यास’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शनिवारी ( २४ सप्टेंबर) रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे.
प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ होत आहे.यावेळी प्रा. मोहन पाटील हे प्रमुख वक्ते आहेत. प्राचार्य श्रीधर हेरवाडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविणार आहेत. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. अक्षरदालन व उदगाव येथील मगदूम कुटुंबियांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
...................