+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Mar 24 person by visibility 213 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज यांना इंडिया, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस कडून उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज शुक्रवारी दिवसभर न्यू पॅलेस येथे आमदार पी.एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्यासह राजकीय, उद्योग, वैद्यकीय, क्रीडा ,सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी महाराजांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप सुरू असताना काँग्रेस पक्षाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट या प्रमुख तीन पक्षांसह अन्य घटक पक्षांनी शाहू महाराजांची उमेदवारी एकमुखाने जाहीर केली. गुरुवारी रात्री काँग्रेस पक्षाने शाहू महाराजांची उमेदवारी घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि साखर वाटप करून जल्लोष साजरा केला.
 आज शुक्रवारी २२ मार्च रोजी सकाळपासून महाराजांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी मान्यवरांची रांग लागली होती. काँग्रेसचे आमदार पी. एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, धीरज डोंगळे बाजार समितीचे अध्यक्ष भारत पाटील, भोगावतीचे संचालक पांडुरंग पाटील, अभिजीत पाटील, मारुती जाधव, शिवाजी कारंडे, व्ही.व्ही. चौगुले, बी.एच. पाटील, सुनील खराडे , करवीर पंचायत समिती माजी अध्यक्ष कृष्णा धोत्रे, संजय गांधी योजनेचे संदीप पाटील, रणजीत पाटील करवीर तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकरराव पाटील यांचा समावेश होता.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, ग्रामीण उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनीही शाहू महाराजांची भेट घेऊन उमेदवारी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
शिवाजी पेठ येथील कॉम्रेड चंद्रकांत यादव ,अजित खराडे, लालासाहेब गायकवाड, माजी उपमहापौर विक्रम जरग, शिवसेनेचे राजू जाधव, चंचल देशपांडे, सुरेश पाटील, अक्षय मोरे, राहुल जरग, संजय पडवळे, प्रकाश राऊत, संदेश भोसले, सुरेश कदम, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, चंद्रकांत सूर्यवंशी अनिल कुराडे यांनी महाराजांचे अभिनंदन केले. शेतकरी संघटनेचे भगवान काटे यांनीही शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांच्या उमेदवारीबद्दल आनंद व्यक्त केला. कोल्हापूर ओबीसी बारा बलुतेदार संघाच्या शिष्टमंडळाने शाहू महाराजांना पुष्पहार अर्पण करून उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या शिष्टमंडळात उमेश पोर्लेकर, गजानन लिंगम, वसंतराव वाठारकर, अरुण कुऱ्हाडे, अविनाश यादव, मदन लोखंडे, संजय ओतारी ,शिवमुर्ती झगडे, गोरख गवळी, पांडुरंग काळे , भारत कोरवी, अर्जुन माने तानाजी मर्दाने, परशुराम सुतार यांचा समावेश होता. 
शाहू विद्यालयाच्या महिला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मदतनीस यांच्या शिष्टमंडळाने शाहू महाराजांची अभिनंदन केले. यावेळी 'जय भवानी जय शिवाजी', ' एकच धून चार जून' अशा घोषणा देण्यात आल्या.