+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Mar 24 person by visibility 3363 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
परीक्षेत लागलेल्या निकाल देण्यासाठी पाचशे रुपयाची लाच मागणाऱ्या कॉलेजच्या क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. सोपान धोंडीराम माने (वय ५४ वर्षे, रा.मसुटे कॉलनी, सरनोबतवाडी, ता.करवीर मुळ रा. नेवरी, ता.कडेगाव,जि. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. तो
न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ कोल्हापूर येथे क्लार्क म्हणून काम करत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती दिली.
या गुन्ह्यातील तक्रारदार हे शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या भारती विद्यापीठ या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या न्यू लॉ कॉलेज, चित्रनगरी कोल्हापूर या लॉ कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत आहे. तक्रारदारांने दिलेल्या तिसऱ्या वर्षातील परीक्षेचा अंतिम निकाल प्रशासकीय कारणामुळे लागलेला नाही. त्याकरिता तक्रारदार हे क्लार्क माने यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारांने त्यांचा निकाल लागणेसाठी ५०० रुपये फी द्यावे लागेल असे म्हणून तक्रारदाराकडे ५०० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता तक्रारीची खातर जमा करून पोलिसांनी शुक्रवारी सापळा रचला. तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना  पकडले. क्लार्क माने यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 
पोलीस उपनिरीक्षक बंबरगेकर, हेड कॉन्स्टेबल 
विकास माने, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस काॅन्स्टेबल संदीप पवार, प्रकाश चौगले
सुरज अपराध यांनी कारवाई केली.