+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Feb 24 person by visibility 414 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
ग्रामीण रुग्णालयात नोकरीच्या नियुक्तीचे पत्र देण्यासाठी डॉक्टरकडून दहा हजार रुपयाची लाच घेणाऱ्या कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मिलिंद रामचंद्र हावळ (वय ५३, रा. साने गुरुजी वसाहत) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी पाच वर्षाची साधी कैद आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील अॅड. ए. एम. पिरजादे यांनी काम पाहिले.
या खटल्याची माहिती अशी की, आरोपी मिलिंद हावळ याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांने सांगली जिल्ह्यातील मिरज येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून इंटरनशीप पूर्ण केली होती. २३ नोव्हेंबर २०१२ रोजी तक्रारदाराने आरोग्य सेवा संचालक मुंबई कार्यालयाकडे वैद्यकीय अधिकारी नियुक्तीसाठी अर्ज केला होता. मुंबई आरोग्य सेवा कार्यालयाने तक्रारदाराची नियुक्ती कोल्हापूर परिमंडळात करावे असा आदेश कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयला दिला होता. २७ नोव्हेंबर २०१२ रोजी तक्रारदाराने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करावी असा अर्ज कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाला दिला होता महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करण्यासाठी कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मिलिंद हावळ याने तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची लाच मागितली.
 तक्रारदाराने लाचेच्या संदर्भात दहा डिसेंबर २०१२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज केला. या अर्जाची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ डिसेंबर २०१२ रोजी सापळा रचला. आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक हावळ याने तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून हावळ याला रंगेहात पकडले. मिलिंद हावळ याला अटक करून त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. अँटी करप्शन पुणे येथील पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी तपास करून या गुन्ह्याचे आरोपपत्र कोर्टात सादर केले.
 जिल्हा सत्र न्यायाधीश साळुंखे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सहाय्यक सरकारी वकील पिरजादे यांनी पाच साक्षीदार तपासले. फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील पिरजादे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश साळुंखे यांनी आरोपी मिलिंद हावळे याला पाच वर्षाची साधी कैद आणि दहा हजार रुपये चा दंड ठोठावला या खटल्यात अॅड प्रियांका सोनवले, अॅड सतीश कुंभार यांचे सहकार्य लाभले.