Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चिन्मय मिशनचे स्वामी अभेदानंद यांची कोल्हापूरात व्याख्यानमालाग्रामीण भागालाही शहरांप्रमाणेच २५ दिवसांत गॅस सिलेंडर द्यावेत : खासदार धैर्यशील मानेशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी २२ उमेदवार शर्यतीत ! शुक्रवारी - शनिवारी मुंबईत मुलाखती ! !१२०० प्राथमिक दूध संस्थासंदर्भात गोकुळची चौकशी, दोन अधिकाऱ्यांची नियुक्तीदख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा एक मे रोजी लोकार्पण सोहळा शिवनेरीनगर मित्र मंडळतर्फे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळाशाळांना उन्हाळी सुट्टी दोन मेपासून कणेरी मठावर अवतरली देशभरातील कलाकुसरी, हस्तकलेचा आविष्कार२१ वर्षात २४ वेळा बदली ! तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी ! !

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी २२ उमेदवार शर्यतीत ! शुक्रवारी - शनिवारी मुंबईत मुलाखती ! !

schedule01 Apr 26 person by visibility 54 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन  : राज्यातील नामांकित विद्यापीठ अशी ख्याती असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी २२ उमेदवार शर्यतीय आहेत. या उमेदवारांच्या येत्या तीन व चार एप्रिल २०२६ रोजी मुंबईत मुलाखती होत आहेत. या मुलाखतीच्या प्रक्रियेतून पाच उमेदवारांची नावे कुलगुरुपदासाठी कुलपती कार्यालयाकडे सादर होतील. कुलपतींमार्फत त्या पाच जण उमेदवारांतून एका उमेदवाराची कुलगुरू म्हणून निवड होते. दरम्यान  शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी ११५ अर्ज प्राप्त झाले होते. कुलगुरू शोध समितीने त्या अर्जांची छाननी करुन शॉर्टलिस्ट तयार केली आहे.

कुलगुरुपदासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या २२ उमेदवारांमध्ये मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण, पदार्थ विज्ञान विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. एस. एस. कोळेकर, यांचा समावेश आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. संजय ढोले, डॉ. संजय चाकणे, दिल्ली विद्यापीठातील डॉ. विलास खरात यांची नावेही २२ जणांच्या यादीत आहेत. या व्यतिरिक्त  विविध विद्यापीठ, एनआयटीमधील ख्यातनाम प्रोफेसर मुलाखतीसाठीच्या २२ उमेदवारांच्या यादीत आहेत. यामध्ये डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. सतीश पाटील, डॉ. ए. एम. महाजन, डॉ. नितीन देसाई, डॉ. विजय खरे, डॉ. स्मिता देशमुख, डॉ. राजेश गच्चे, श्रीमती डॉ. बेलनकर,प्रा. डॉ. जोगी, एनआयटीमधील राजेंद्र काकडे यांचा २२ उमेदवारांत समावेश आहे.

……………………………

ऑक्टोबर २०२५ पासून कुलगुरुपद रिक्त.

तत्कालिन कुलगुरू डी. टी. शिर्के शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला. सध्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे तर प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव आहेत. दरम्यान कुलगुरू शोध समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. २३ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ११५ जणांनी अर्ज दाखल केले. फेब्रुवारी महिन्यात त्या अर्जांची छाननी झाली. त्यातून समितीने २२ उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केली आहेत.
 

……………………………………………………………………………….

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes