दिव्यांग खेळाडूंना बक्षीस स्वरुपात सानुग्रह अनुदान : जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचा निर्णय
schedule21 Sep 22 person by visibility 699 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
शाळेत शिकत असणाऱ्या व शालेय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत जागतिक स्तरावर, देशपातळीवर व राज्यपातळीवर, पहिला व दुसरा क्रमांकाने यशस्वी झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना रुपये ७५ हजार, ५० हजार व २५ हजार सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. घेण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची बैठक पार पडली.
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्राचे वाटप करून सेवा पंधरवड्याच्या मोहिमेचे उद्घाटन झाले. चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यात प्राप्त झालेले तीन हजार आठशे चौदा वैश्विक ओळखपत्र दिव्यांगांना प्रत्यक्ष घरी जाऊन देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.
या बैठकीमध्ये समाज कल्याण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांचे तपासणी अहवाल त्वरित सादर करण्याबाबत तालुक्याच्या अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी सूचना दिल्या.