सैनिक टाकळी येथे एमआयडीसीची कार्यवाही ताबडतोब सुरु करावी, चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी
schedule12 Aug 26 person by visibility 15 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळकडे (एमआयडीसी) हस्तांतरित केलेल्या जागेत एमआयडीसी सुरू करण्याची कार्यवाही ताबडतोब अंमलात आणावी अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने निवेदनाव्दारे निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांच्याकडे केली. निवेदनात म्हंटले आहे, सैनिक टाकळी येथे एमआयडीसी साठी जागा प्रस्तावीत असून त्याबाबत शासन अध्यादेश देखील निघालेला आहे. तेथे एमआयडीसी साकारल्यास मोठे उद्योग येऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासास हातभार लागेल व स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. शिरोळ तालुक्यातील गांवागांवात देखील उद्योजक घडावेत अशी आमची भूमिका आहे असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेटे, भरत ओसवाल, माजी उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, माजी खजानिस राहुल नष्टे, संचालक अनिल धडाम उपस्थित होते.