+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Jan 24 person by visibility 279 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
आर्किटेक्टच्या घरी चोरी करणाऱ्या तीन चोरट्याकडून शाहूपुरी पोलिसांनी साडेतीन लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले. रोहित महेश सावंत (वय २३), रोहन अरुण कांबळे (वय२०, दोघे राहणार विचारे माळ) जस्सी सुधीर चांदणे ( २४, रा. ब्रह्मपुरी, जुना बुधवार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयित गाड्या सर्व्हिसिंगचे काम करत होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. रुईकर कॉलनी राज बंगला येथे राहणाऱ्या आर्किटेक्ट पृथ्वीराज पाटील यांनी त्यांच्या घरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला .आर्किटेक्ट पाटील यांच्या घरी नोकर म्हणून काम करणाऱ्या रोहित सावंत, त्याचा मित्र रोहन कांबळे आणि जस्सी कांबळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता रोहित सावंत याने चोरीची कबुली दिली. त्याने रोहन आणि जस्ऊ यांच्या मदतीने आर्किटेक्ट पाटील यांच्या घरातील दागिन्यांची चोरी केली होती. ही चोरी एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने केली होती अशी माहिती तपासात पुढे आलेली आहे. पोलिसांनी २१ ग्रॅम दोन सोन्याच्या बांगड्या, २७ ग्रॅम वजनाच्या दोन पदरी सोन्याचा हार, एक ग्रॅम सोन्याची चेन , तीन ग्रॅम सोन्याची अंगठी, चार ग्रॅम च्या दोन रिंगा, दोन सोन्याच्या बाळ्या आणि पाच ग्रॅम वजनाचे वळे हस्तगत केले.
 पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, पोलिस अंमलदार मिलिंद बांगर, महेश पाटील, विकास चौगुले, बाबा ढाकणे, रवी आंबेकर, लखन पाटील ,शुभम संकपाळ यांचा तपासात सहभाग होता.