Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !! विद्यापीठ - उद्योगांनी एकत्रित काम करणे आवश्यक – कुलगुरू आर. के. कामतशिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, कृष्णा ठाकरे प्राधिकृत अधिकारी गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांचा निकाल वेळेत न दिल्यास  आंदोलनकरवीर हायकर्सच्या सातजणांनी  फडकाविला एवरेस्ट बेस कँपवर तिरंगाकोल्हापुरात रंगतोय आयपीएल फॅन पार्क खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन: आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुन्हा ताकतीने उभा करणार - शशिकांत शिंदे

जाहिरात

 

ग्रामीण भागातील डॉक्टरांचा केडीजीपीएतर्फे सन्मान, रविवारी पुरस्कार वितरण समारंभ

schedule07 Apr 26 person by visibility 216 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा (केडीजीपीए ), आठवा वर्धापनदिन, १२ एप्रिल २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून असोसिएशनतर्फे, ग्रामीण भागात रुग्णसेवा करणाऱ्या पंधरा डॉक्टरांना ’केडीजीपीए धन्वंतरी पुरस्कार’नी सन्मानित करण्यात येणार आहेत. तसेच बालिंगा येथील डॉ. वसंत पाटील यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार दिला जाणार आहे.’ अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक रणदिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली

 या कार्यक्रमासाठी खासदार शाहू महाराज व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.फुलेवाडी मेन रोड येथील हॉटेल राहूल येथे हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. असोसिएशनतर्फे देण्यात येणाऱ्या पंधरा ’केडीजीपीए धन्वंतरी पुरस्कार’ यादीत प्रत्येक तालुक्यातील डॉक्टरांचा समावेश आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील डॉ. शिवाजी मगदूम, पन्हाळा तालुक्यातील डॉ. नितीन माने, शाहूवाडीतून डॉ. सुभाष पाटील, हातकणंगलेतून डॉ. राजेश कुंभार, शिरोळमधून डॉ. सुहास कांबळे, गडहिंग्लजमधून डॉ. किरण खोराटे, चंदगड तालुक्यातील डॉ. सुभाष पाटील, आजरा तालुक्यातील डॉ. प्रविण निंबाळकर, भुदरगड तालुक्यातील डॉ. सचिन सुतार, राधानगरीतून डॉ. अमित काळबेरे, गगनबावडा तालुक्यातील डॉ. शरद पाटील, कागल तालुक्यातीलडॉ. रवींद्र कुंभार, निगवे खालसा येथील डॉ. बाबुराव पाटील, पुनाळमधून डॉ. श्रीनिवास चोपडे, सांगरुळ येथील डॉ. प्रकाश पाटील यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याशिवाय वैद्यकशास्त्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. राजकुमार पाटील, डॉ. बद्रुद्दीन मणेर आणि डॉ. प्रिया पाटील यांचा विशेष सन्मान होणार आहे. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देसाई, कार्याध्यक्ष डॉ. संजय केटकाळे, डॉ. अनिल कांबळे, डॉ. सरदार पाटील, आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes