Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

प्राथमिक शिक्षक बँकेला तीन कोटी सहा लाख निव्वळ नफा : अध्यक्षा वर्षा शरद केनवडे

schedule07 Apr 26 person by visibility 378 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था समजल्या जाणाऱ्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी  बँकेचा विकासाचा चढता आलेख कायम आहे. बँकेला गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवसायात वाढ तसेच यावर्षी  तब्बल ३ कोटी ६ लाख इतका विक्रमी नफा झाला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष वर्षा शरद केनवडे व व्हाईस चेअरमन पद्मजा तानाजी मेढे यांनी दिली.     बँकेचे   २०२५-२६ या आर्थिक वर्षात भाग भांडवल २८.०२ कोटी झाले आहे. तसेच बँकेचा स्वनिधी ३७.८४ कोटी झाला आहे.बँकेच्या ठेवीमध्ये २३.९३ कोटीची वाढ होवून एकूण ठेवी ४३८.०९ कोटी इतक्या झाल्या आहेत. बँकेच्या कर्ज वितरणातही वाढ झाली असून २९५.९९ कोटीचे कर्ज वितरण झाले आहे. बँकेचा व्यवसायात वाढ होवून ७३४.०८ कोटीवर एकूण व्यवसाय गेला आहे. निव्वळ एन.पी.ए चे प्रमाण १.७८ टक्क्यावरून १.२२ टक्क्यावर कमी झालेले आहे. यामध्ये गेले वर्षभर जागतिक, शेअर मार्केटमध्ये ढासळलेली अवस्था, कमी झालेले रेपो रेट, सध्या असलेले अत्यल्प मार्जिन या अडचणींवर मात करून संस्थेने आपली घौडदौड सुरूच ठेवली आहे. बँकेस निव्वळ नफा ३ कोटी सहा लाख रुपये झाला असून नफ्यात २०.७३ लाख इतकी वाढ झाली आहे.

 "आमची एकच नीती, सभासदांची आर्थिक उन्नती" हे ब्रीद घेवून सत्तेवर आलेले संचालक मंडळ सध्या झालेल्या ३ कोटी ०६ लाखांच्या नफ्यावर समाधानी नसून भविष्यात ४ ते ५ कोटी नफ्याचे उद्दिष्ठ संचालक मंडळासमोर आहे. सभासदांचा बँकेवरील वाढता विश्वास, सुकाणू नेते मंडळी यांचे दिशादर्शक, मार्गदर्शक, सहकारातील सलग डिव्हिडंड मानदंड, सभासदाभिमुख कारभार या सर्वांच्या जोरावर उद्दिष्ठ निश्चित पार होईल. बँकेच्या सभासदांसाठी एक जानेवारी २०२६ रोजी पासून "सभासद उत्कर्ष कर्ज" ही योजना ९ दराने सुरु केली. सभासदांकडून उत्कर्ष कर्ज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

निवडणूक जाहीरनाम्यातील वचननामा पूर्ण करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाची वाटचाल सुरु आहे. पारदर्शक कारभार सुरु असल्याने सभासद बँकेकडे आकर्षित होताना दिसत आहेत. गेल्या चार वर्षात सभासद आणि संचालक ही दरी पूर्णतः कमी होताना दिसत आहे. प्रत्येक सभासद "माझी बैंक" या भावनेने व्यक्त होताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिक्षक बँकेचे सर्व संचालक मंडळाच्या नियोजनबद्ध कार्यनीतीने, सुकाणू समिती नेते यांचे मोलाचे मार्गदर्शन, सभासदांचा विश्वास व सेवकांच्या सहकार्याने बँकेला उर्जित अवस्थेत आणले असल्याचे ते म्हणाले. संचालक  अर्जुन पाटील, सुनिल एडके, राजेंद्रकुमार पाटील, बाळासाहेब निंबाळकर, बाळकृष्ण हळदकर, सुरेश कोळी, शिवाजी रोडे-पाटील, शिवाजी बोलके, अमर वरुटे, रामदास झेंडे, एस. व्ही. पाटील, गजानन कांबळे, नंदकुमार वाईंगडे, बाबू परीट, गौतम वर्धन, तज्ञ संचालक बाबुराव कांबळे, अमोल पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes