मनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपद
schedule16 Nov 25 person by visibility 34 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महानगरपालिकास्तर क्रिकेट स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर च्या १९ वर्षाखालील (मुले) क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले .येथील मेरी वेदर मैदान येथे या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये चाटे जूनियर कॉलेज, महावीर कॉलेज व कॉमर्स कॉलेजचा पराभव करीत या स्पर्धेत विजेतेपद मिळविले. विजेत्या संघाची व खेळाडूंची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे , संस्थेचे सीईओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख व प्रशिक्षक प्रा. संतोष कुंडले , प्रा. साद मुजावर, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. समीर पठाण, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.