बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला केंद्रीय मंत्र्यांकडून पुरस्कार प्रदान
schedule15 Sep 25 person by visibility 64 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे सोमवारी वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी व विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या" बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर वेंगुर्ला महाविद्यालया"ला सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय . हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ झाला. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई ,चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई व कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनराज गोसावी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू अजय भामरे, केंद्रीय सचिव चंद्रशेखर कुमार, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे उपस्थित होते. मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पस येथे पुरस्कार वितरण समारंभ झाला