कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनमध्ये आज जीएसटीबाबत कार्यशाळा
schedule15 Sep 25 person by visibility 34 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स व कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमााने सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) जीएसटी 2.0 बाबत व्यापारी-उद्योजकांमध्ये असणारी संभ्रमावस्था दूर होणे व जीएसटी बदलाचा फायदा सामान्य नागरिकांमध्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने कार्यशाळा आयोजित केली आहे. इंजिनीअरिंग असोसिएशन हॉल येथे दुपारी तीन वाजता कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत पुणे विभागाचे सीजीएसटीचे चीफ कमिशनर मयंक कुमार, बिपीन उपाध्याय, प्रसाद गोरसे, रोहित जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. जीएसटी 2.0 काय आहे? (महत्वाचे बदल), पूर्वीच्या आणि नंतरच्या दरातील फरक, वस्तू व सेवांचे क्षेत्रनिहाय परिणाम, व्यापारी-किरकोळ विक्रेत्यांची भुमिका, व्यापाऱ्यांपर्यंत संवाद साधण्यासाठीचे पाऊल, ग्राहकांना होणारे फायदे, आव्हाने व धोके या व अशा महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.