प्रा. जयसिंग दिंडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी
schedule15 Sep 25 person by visibility 40 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील न्यू कॉलेज ज्युनियर विभागातील प्रा. जयसिंग बाबुराव दिंडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेंतर्गत मराठी विषयाची पीएचडी पदवी प्राप्त केली. शिक्षण सुधारकांच्या चरित्र ग्रंथांचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. दूध साखर महाविद्यालय बिद्रीचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे, साहित्यिक डॉ.राजन गवस, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, प्रा डॉ. रणधीर शिंदे, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक प्रा. विनय पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही एम पाटील, प्रा. डॉ. शैलजा मंडले, प्रा. डॉ. प्रल्हाद माने , प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील, प्रा.डॉ.अरुण शिंदे, ग्रंथपाल प्रा. डॉ. रवींद्र आडाव, प्रबंधक एम. वाय. कांबळे, पत्नी मधुरा दिंडे (पोलिस निरीक्षक) यांचे सहकार्य लाभले. दिंडे हे करवीर तालुक्यातील बहिरेश्वरचे आहेत.