दक्षिणमध्ये २४ हजार लाभार्थ्यांना स्वखर्चातून आयुष्मान भारत कार्ड देणार- अमल महाडिक
schedule04 Dec 23 person by visibility 355 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २४ हजार पात्र लाभर्थ्यांना स्वखर्चाने आयुष्यमान कार्ड वितरित करणार आहे.’असे माजी आमदार अमल महाडिक यांनी जाहीर केले आहे.
सर्वसामान्य लोकांना घरबसल्या आयुष्मान भारत कार्ड मिळावे या हेतूने हा निर्णय घेतला आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बूथ रचनेच्या माध्यमातून घरोघरी हे कार्ड्स वितरित केले जातील. केंद्र शासनाची ही अभिनव योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अमल महाडिक यांचा प्रयत्न आहे. आयुष्मान भारत कार्ड घरबसल्या मिळाल्यामुळे लाभार्थ्यांची धावपळ वाचणार असून भविष्यात चांगल्या आरोग्यविषयक सेवेचा लाभ त्यांना घेता येणार आहे. सर्वसामान्यांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतून केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली आहे. या अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार होणार आहेत. यासाठी आयुष्यमान कार्ड असणे अत्यावश्यक आहे.