+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Oct 22 person by visibility 218 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संजय घोडावत फाउंडेशनला महात्मा पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संजय घोडावत यांनी स्वीकारला.
सामाजिक कार्यकर्ते अमित सचदेव यांनी महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हे पुरस्कार वैयक्तिक, सीएसआर,संस्थात्मक पातळीवर दिले जातात. एक सशक्त,चांगला आणि प्रभावी समाज घडविण्यात फाउंडेशनने दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   संजय घोडावत फाउंडेशनच्या वतीने कोरोना काळामध्ये पाच लाख लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. त्यांच्यासाठी फंड उभा करून अन्नपाण्याची सोय करण्यात आली. कोविड केअर सेंटरची उभारणी करून उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या यामध्ये ३५ हजार पाचशे रुग्णांनी येथे उपचार घेतले.
  फाउंडेशनच्या वतीने माऊली वृद्धाश्रम येथे सुसज्ज अशा निवाऱ्याची सोय करण्यात आली. याचा फायदा वृद्धाश्रमात राहणाऱ्याअनेक ज्येष्ठांना होत आहे. फाउंडेशन मार्फत आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदान करून जीवदान दिले आहे. गरजू मुलींसाठी स्वखर्चाने १९९५ मध्ये कन्या महाविद्यालयाची सुरुवात केली.
     हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर फाउंडेशनचे चेअरमन संजय घोडावत म्हणाले, “फाउंडेशनने केलेल्या अपार कष्टामुळे हा पुरस्कार मिळालाय. समाजामध्ये आपण राहत असताना दानधर्म करणे, परोपकार करणे, इतरांचा चांगला विचार करणे हाच जगण्याचा खरा दागिना आहे तो सर्वांनी परिधान केला पाहिजे. परोपकाराची शक्ती ही अफाट आहे. चांगले कार्य करत राहणे हेच आपल्या फाउंडेशनचे तत्व आहे..