+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Feb 24 person by visibility 197 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कर्नाटकातील सराईत घरफोडी गुन्हयातील संशयितास अटक करून आठ गुन्ह्यांचा छडा लावला. आठ घरफोडी गुन्हयातील सात लाखाचे दागिने आरोपीकडून पोलिसांनी हस्तगत केले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातील पोलिसांना कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील घरफोडी गुन्ह्यातील आरोपी सुमित महादेव निकम (वय २७, रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि.बेळगाव, कर्नाटक) हा चोरीचे दागिने घेऊन कोल्हापुरात येणार असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी मार्केट यार्ड लोणार वसाहत येथे संशयित सुमित निकम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे १०७ ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुरगुड, राधानगरी, शहापूर इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येथील प्रत्येकी दोन तर आजरा चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आणला. अटक केलेला संशयित सुमित निकम याच्यावर यापूर्वी वीस गुन्हे दाखल आहेत .
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार तुकाराम राजगिरे, सुरेश पाटील, सागर माने, आयुब गडकरी ,अमित मर्दाने,सुप्रिया कात्रट, यशवंत कुंभार, संजय पडवळ,संतोष पाटील यांनी गुन्ह्याचा तपास केला.