सत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
schedule29 Jul 26 person by visibility 12 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी, (दोन ऑगस्ट २०२६ ) कोल्हापुरात ‘अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन’आयोजत केले आहे. दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाध्यक्ष आहेत. शाहीर दिलीप सावंत हे उद्घाटक आहेत. साहित्यिक डॉ. डी. वाय. जमादार हे स्वागताध्यक्ष आहेत. अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन होणार आहे अशी माहिती निमंत्रक व सत्यशोधक इतिहास परिषदेचे प्रमुख डॉ. कपिल राजहंस, मदन पवार यांनी दिली. या संमेलनात ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जातीअंताचा विचार’या विषयावर परिसंवाद आहे. डॉ. अलोक जत्राटकर हे परिसंवादाचे अध्यक्ष तर डॉ. वैशाली चौगुले, राहुल सडोलीकर हे वक्ते आहेत. या संमेलनात डॉ. भारत पाटणकर व प्रा. किसनराव कुराडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला शंकर पुजारी, सुनील जाधव, अंतिमा कोल्हापूरकर आदी उपस्थित होते.