Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राष्ट्रवादीतर्फे शुक्रवारी नूतन जिप -पंचायत समिती सदस्यांचा सत्कारचित्रकार बबन मानेंच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शनआंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी विकासवाडीनजीक जमीन, मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीकेआयटी कॉलेजमध्ये २६ गुणवंत विद्यार्थ्यांना मेरीट स्कॉलरशिपचिन्मय अमृत यात्रा गुरुवारी कोल्हापूर शहरातकोल्हापूर जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार…राष्ट्रवादी ठरला मोठा भाऊ!जिल्ह्यात ताकत हसन मुश्रीफांचीच ! २० जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्षपदासाठी शड्डू ! !गगनबावडयात काँग्रेसचेच वर्चस्व, सोनाली पाटील, संभाजी पाटणकर विजयीकळंबामध्ये विनीता भोगमनी फुलविले विजयाचे कमळडीवाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

जाहिरात

 

राष्ट्रवादीतर्फे शुक्रवारी नूतन जिप -पंचायत समिती सदस्यांचा सत्कार

schedule10 Feb 26 person by visibility 67 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या मित्रपक्षांच्या सदस्यांचा सत्कार पक्षाच्यावतीने शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट हाऊस रस्त्यावरील सिंचन भवनजवळच्या धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉल येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी ही माहिती दिली
         

यावेळी राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या शिरोळच्या राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, मानसिंगराव गायकवाड, डॉ. नंदिनी बाभुळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत
       

नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा म्हणजेच एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे. जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होऊन राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार आहे. तसेच; विविध पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळविली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes