चित्रकार बबन मानेंच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शन
schedule10 Feb 26 person by visibility 23 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चित्रकार बबन सावंता माने यांचे स्टेप्स ऑफ इटरनेटी या संकल्पनेवर आधारित चित्र प्रदर्शन मुंबईमध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे सोळा ते २२ फेब्रुवारी २०२६ येथे होत आहे. ही चित्रमालिका वाराणसीच्या पवित्र घाटावर आधारित आहे या घाटावरील प्रत्येक पायरी म्हणजे केवळ दगडावर कोरलेली रचना नसून ती जीवन,श्रद्धा आणि शाश्वतेकडे नेणाऱ्या अनंत प्रवाशांची साक्ष आहे तसेच गंगेचे निर्मळ पाणी, घाटावरील पायऱ्या, मंदिर व प्राचीन वस्तू गंगेत अलगत वाहत जाणारे दिवे, पूजा प्रकाश धूर हे वातावरण अत्यंत भावपूर्ण असून गंगा घाटाचे सुंदरता खोली दृढता, लय आणि भव्यता वेगवेगळ्या वेळचे सौंदर्य कॅनव्हास वर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे हे ऍक्रेलिक माध्यमातील या कलाकृती असून सदर चित्र प्रदर्शन सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे