Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रकार बबन मानेंच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शनआंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी विकासवाडीनजीक जमीन, मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीकेआयटी कॉलेजमध्ये २६ गुणवंत विद्यार्थ्यांना मेरीट स्कॉलरशिपचिन्मय अमृत यात्रा गुरुवारी कोल्हापूर शहरातकोल्हापूर जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार…राष्ट्रवादी ठरला मोठा भाऊ!जिल्ह्यात ताकत हसन मुश्रीफांचीच ! २० जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्षपदासाठी शड्डू ! !गगनबावडयात काँग्रेसचेच वर्चस्व, सोनाली पाटील, संभाजी पाटणकर विजयीकळंबामध्ये विनीता भोगमनी फुलविले विजयाचे कमळडीवाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना  कुसुम पुरस्कार, बुधवारी वितरण

जाहिरात

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी विकासवाडीनजीक जमीन, मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

schedule10 Feb 26 person by visibility 34 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरालगत असलेल्या विकासवाडी येथील राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ४२१ हेक्टर जागेपैकी १२ हेक्टर जमीन आंतरराष्ट्रीय  क्रिकेट स्टेडियमसाठी उपलब्ध करुन देण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

क्रीडा पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून क्रिकेट प्रेमींमधून होत होती. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने केलेल्या या मागणीच्या पूर्ततेसाठी  सरकारी पातळीवर खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आमदार अमल महाडिक यांनी एकत्रित प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन क्रीडा मंत्र्यांकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. ही बाब   ध्यानात घेऊन मंगळवारी, दहा फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम झाल्यास कोल्हापूरसह सांगली, सातारा,सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच क्रिकेटच्या नकाशावर कोल्हापूरची ओळख ठळक बनणार आहे. करवीर तालुक्यातील विकासवाडी येथील औद्योगिक महामंडळाच्या मालकीची बारा हेक्टर जमीन क्रिकेट स्टेडियम साठी संपादित करण्यात येणार आहे. लवकरच या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार. नियोजित स्टेडियम हे माझ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार असल्याचा विशेष आनंद आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडियम आकाराला येऊन कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेला चालना मिळेल.
नियोजित आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया लवकरच होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. असे महाडिक म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes