अन् छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा विद्युत रोषणाईने उजळला
schedule05 Dec 24 person by visibility 62 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असणारे लाईट बंद पडल्याने गेले काही दिवस पुतळा परिसरात होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना माहिती दिली. आमदार क्षीरसागर यांनी याची तत्काळ दखल घेतली. पुतळ्याभोवती असलेली विद्युत रोषणाई तात्काळ बदलायच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या विद्युत विभागाकडून पुतळा परिसरातील विद्युत रोषणाईच्या कामाची दुरुस्ती करून नवीन दिवे बसविण्यात आले. यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा व परिसर पुन्हा एकदा विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. आमदार क्षीरसागर यांच्या या कार्यतत्परतेबाबत नागरिकांमधून समाधान होत आहे.