Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बारावीत निकालात कोल्हापूर विभागाची घसरण, राज्यात सहाव्या स्थानावर देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार कॉलेज ऑफ कामर्सचा निकाल ९४.१४ टक्के गोखले कॉलेजचे बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश,भूशास्त्र विषयात तेरा विद्यार्थ्यांना शंभर गुण*बापू गेले…*मेन राजाराम हायस्कूल -ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत घवघवीत यशखडके ॲकॅडमीचा बारावीचा निकाल शंभर टक्के  कामगार दिनी महावितरणमध्ये ६४ वीज कर्मचाऱ्यांचा गौरवजिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात, पदाधिकारी - अधिकाऱ्यांची उपस्थितीअश्रूनी डबडबलेले डोळे…अनावर हुंदका…गहिवरलेली मने अन् हृदय पिळवटणून टाकणारा आईचा टाहो…असाही एक . . . आगळावेगळा शाही विवाह सोहळा

जाहिरात

 

कोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणुकीबरोबरच पुस्तक वाटप

schedule16 Jun 25 person by visibility 889 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील  कोरगांवकर हायस्कूलमध्ये शाळेच्या प्रथमदिवशी साने गुरुजी बालक मंदिर, सावित्री श्रीधर विद्यालय आणि कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांवर गुलाबपाकळ्या आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून आनंददायी प्रवशोत्सव झाला. मुख्य प्रवेश द्वारापासून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत विद्यार्थ्यांना सवाद्य वाजत गाजत आणण्यात  आले यावेळी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला शिक्षक आणि पालक यांनी पाकळ्यांचा वर्षाव करून आनंददायी स्वागत केले. शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले याबरोबर सर्व विद्यार्थ्यांना साखर पेढ्यांचे वाटप करून वर्गामध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांचे प्रमुख पाहुणे प्राजक्ता मुळीक आणि सीमा चौगुले - पाटील यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पुस्तकांचे वाटप केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक  सौंदलगे आणि सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेचे माजी ग्रंथपाल शंकर कामत यांनी पाठयपुस्तकाचे वितरण केले सदाशिव राठवळ यांनी सूत्रसंचालन केले . पर्यवेक्षिका सुरेखा पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes