+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Jan 24 person by visibility 294 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  :
भाऊसिंगजी रोडवरील सिमंधर ज्वेल या सराफ पेढीवर  गुरुवारी, २५ जानेवारी रोजी दुपारी चोरट्यानी कुलुप तोडून रोख सात लाख रुपये आणि १५ तोळे सोन्याचे दागिने असा १५ लाख रुपये किंमतीचे मुद्देमाल चोरुन नेला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त असताना भर व्यापारी वस्तीत चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते.
  भाऊसिंगजी रोडवर धनराज जैन यांची सिमंधर ज्वेल नावाची सराफ पेढी आहे.गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धनराज जैन हे सराफ पेढी
बंद करून जेवण करण्यासाठी घरी गेले होते. त्यानंतर दुपारी तीन च्या सुमारास ते सराफी पेढीत परत आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी सराफ पेढीचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश 
केला. चोरट्यानी दुकानातील रोख सात लाख रुपये आणि अंदाजे दीडशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केलेत. पेरणीचे मालक जैन यांनी 
पोलिसांची संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.