Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवायपी पॉलिटेक्निकचा  योगेश घुले ठरला गुगल स्टुडन्ट अँबेसिडर केएमटीतील रोजंदारी - अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या : सभापती सत्यजित जाधव चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 जणांची माघार ! तीन जागा बिनविरोध होणार!! डॉ. सुनेत्रा शिराळे यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीकोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ कराआयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावाचित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसलेकृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादरशिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफ

जाहिरात

 

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 जणांची माघार ! तीन जागा बिनविरोध होणार!!

schedule28 May 26 person by visibility 90 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी 13 जणांनी अर्ज मागे घेतले. 17 जागेसाठी एकूण 60 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तीन जागेसाठी प्रत्येकी एक - एक अर्ज दाखल झाल्यामुळे  त्यापैकी आता 47 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
उमेदवारी अर्ज माघार घेणाऱ्यांमध्ये कला दिग्दर्शन गटातून अमर मोरे, छायाचित्रण गटातून बाबा लाड, निर्माता व अभिनेता गटातून आकाराम पाटील, कामगार गटातून बाळकृष्ण बारामती, निर्माता गटातून गणेश शिंदे,  अभिनेता गटातून धर्मेंद्र यादव, दिग्दर्शन गटातून अर्जुन नलवडे, अभिनेता गटातून महादेव साळोखे, अभिनेता गटातून सुभाष गुदेशा, अभिनेता गटातून प्रदीप कोतमिरे, कला दिग्दर्शन गटातून  श्याम लोंढे, अभिनेत्री गटातून नीलम शिर्के यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली आहे. दरम्यान अभिनेत्री गटातून नीलम शिर्के यांची उमेदवारी माघार झाल्यामुळे या गटामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता राहिली आहे. संकलन गटातून विजय खोचीकर व गायक - संगीत गटातून आनंद शिंदे  शिंदे या दोघांचे प्रत्येकी एक - एक अर्ज दाखल झाल्यामुळे या दोन्ही गटातील बिनविरोध निवडीची औपचारिकता राहिली आहे. 26 ते 28 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज  माघारीचा कालावधी होता. गुरुवारी 28 मे 2026 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. वेगवेगळ्या गटातील निवडणुका बिनविरोध हव्यात यासाठी प्रयत्न झाले. तीन गटांमध्ये यश आले. तर 14 गटामध्ये निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी संबंधितांनी निवडणूक अधिकारी रागिणी खडके यांच्याकडे उमेदवारी माघारीचे अर्ज सादर केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक दहा वर्षांनी होत आहे. 3403 इतके सभासद आहेत. सात जून 2026 रोजी मतदान आहे. तर 8 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes