कृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादर
schedule27 May 26 person by visibility 38 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी, ‘तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात’ निवेदन दिले. तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने राज्यव्यापी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. या निवेदनात ‘महाविद्यालयीन मोहिमेसाठी अँटी-नारकोटिक्स विभागाकडून विशेष नोडल ऑफिसर नियुक्त करणे. प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी कॅम्पस अॅम्बेसेडर’ नियुक्त करण्यास परवानगी देणे. विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने आत्मरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.‘ड्रग्ज आणि नार्को-टेररिझम’ विषयावर कॉलेज कॅम्पसमध्ये जनजागृती सत्रे घेणे. पालकांसाठी विशेष मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करणे. युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा व क्रीडा संस्कृतीला चालना देणे.’ या मागण्या केल्या आहेत. पोलिस महासंचालक दाते यांनी याविषयी सकारात्मक प्रतिसाद देत विषय गांभीर्याने विचारात घेण्याचे आश्वासन दिले.