Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफशिवराज्याभिषेकदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ! व्याख्यानमाला, मिरवणुकीचे आयोजन !!अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलनलिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषणविवेकानंद कॉलेज म्हणजे सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महाद्वार - प्राचार्य अभयकुमार साळुंखेमहिला - बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांचा कार्यालयीन प्रवेशआरोग्य विभागातील तेवीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याउद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !!

जाहिरात

 

सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफ

schedule27 May 26 person by visibility 49 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :गोकुळ निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहेआम्ही गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढायची, जिंकायची आणि चेअरमन महायुतीचाच करायचा हे ठरलेलं आहे.’असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

कोल्हापुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी गोकुळसह राज्यातील विविध विषयावर स्पष्ट मत मांडले. गोकुळमध्ये महायुतीचे जागावाटप कसे राहील ? या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले,महायुतीचे जागावाटपात आजघडीला यांना एवढ्या जागा- त्यांना तेवढ्या जागा असं आजघडीला तरी होणार नाही. गोकुळ दूध संघाच्या सभासदांची कच्ची यादी पक्की यादी तयार करणे, असा हा कार्यक्रम आहे. याचा अर्थ संस्थांकडे ठराव जाणे आणि संस्थांनी व्यक्ती प्रतिनिधी अधिकृत करणे. त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल.

साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक लागेल असा अंदाज आहे. गोकुळची ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार हे मी सातत्याने जाहीर केले आहे. दरम्यान; या निवडणुकीचा पहिला टप्पा आहे की आपापले लोक हे चांगल्या पद्धतीने कसे ठराव करतील आणि त्यानंतरचा जो निवडणुकीचा टप्पा आहे तो अजून पुढे आहे. मतदार यादी होणार नाही तोपर्यंत जागावाटप होणार नाही. मतदार यादी झाल्यानंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळे त्यावर आत्ताच बोलणं अतिघाईचे होईल.’

गोकुळ दूध संघाच्या उमेदवारीसाठी सव्वाशे ते दीडशे ठरावांची जुळणी हवी, या विषयावरून ठिणगी पडली काय? असे विचारल्यावर मुश्रीफ म्हणाले, अशी ठिणगी वगैरे काही नाही. हे सर्व ठराव झाल्यानंतर सर्व परिस्थिती मुख्यमंत्र्यांकडे सांगू आणि तेच याबाबतचा निर्णय घेतील.  २०२९ ची निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याच्या मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता  मुश्रीफ म्हणाले, ज्या- ज्यावेळेला निवडणुका येतात त्या- त्यावेळी सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करीत असतात. निवडणुका या महायुती म्हणून एकत्रितच लढल्या जातील.असेही मुश्रीफ म्हणाले ‘अर्थ खाते हे आमच्या पक्षाकडे होते. अद्याप ते  मिळालेले नाही. ते नंतर देतो असे सांगितले होते. याबाबतचा निर्णय लवकरच होईल.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes