+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Jan 24 person by visibility 284 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
मशिदीची कमिटी बरखास्त केल्याच्या कारणावरून झालेल्या तलवार हल्ल्यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. मेहबूबखान तोताखान पठाण (वय ६२) आणि नासर तोताखान पठाण ( वय ५८, दोघे रा. सदर बाजार)हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली. 
याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अझर दस्तगीर फकीर (वय ४८ रा. सदर बाजार) आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. काल शुक्रवारी रात्री पोलिसांनी सदर बाजार परिसरात दीड ते दोन तास कोंबिंग ऑपरेशन केले होते त्यानंतर अवघ्या काही ताकतच तलवार हल्ला झाल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सदर बाजार येथे सुन्नथ जमान मशीद असून या मशिदीचे ट्रस्टीचे अध्यक्ष व कमिटी बरखास्त केल्याच्या कारणावरून आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अझर फकीर व त्याच्या सहकाऱ्यांनी मेहबूबखान पठाण यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात मेहबूब खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सोडवण्यास गेलेल्या नासर पठाण हेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी शहर पोलिस उप अधीक्षक अजित टिके यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.