+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Mar 24 person by visibility 370 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या वडिलांसाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली असून आज सोमवारी त्यांनी राधानगरी तालुक्यातील नेते पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या
गेल्या आठवड्यात संभाजीराजे यांनी चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील प्रमुख राजकीय मंडळींच्या भेटी घेतल्या.
 सध्या ते राधानगरी तालुक्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून आज सोमवारी पहिल्या दिवशी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, राजू मोरे, शेकापचे संजय डकरे, बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, भोगावती कारखान्याचे संचालक ए. डी. पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष उत्तम पाटील यांच्या घरी भेट दिली. यावेळी संबंधित गटाच्या उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना शाहू छत्रपती महाराज यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.
 दरम्यान, कसबा तारळे येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित राहून संभाजीराजे यांनी सर्व कार्यकर्त्यांना शाहू महाराजांना लोकसभेत विजयी करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. 
यावेळी भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, हिंदुराव चौगुले, संजयसिंह पाटील, मधुकर रामाने, फत्तेसिंह सावंत, प्रवीण ढोणे, संजय पोवार आदी उपस्थित होते.