दोस्तीची कथा सांगणारा ‘रुप नगर के चीते’सोळा सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला
schedule08 Sep 22 person by visibility 421 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : दोन मित्रांमधील दोस्तीची कथा सांगणारा ‘रुप नगर के चीते’हा मराठी चित्रपट सोळा सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘तुमच्या मित्राच्या मनातला आवाज तुम्ही कधी ऐकलाय का ?’ या टॅगलाइनवर हा सिनेमा आधारलेला आहे. मैत्रीचे धागे जाणीवपूर्वक जपणे कसे महत्वाचे असतात हे सांगू पाहणारा हा सिनेमा असल्याचे दिग्दर्शक विहान सुर्यवंशी यांनी सांगितले.
या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शकासह कलाकारांची टीम कोल्हापुरात आली होती. या सिनेमात करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, सना प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिनेमात मुग्धा चाफेकर, आयुषी भावे, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, रजत कपूर हे कलाकार अहेत.
या सिनेमाची निर्मिती एस एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली आहे. खरी मैत्री म्हणजे आनंदाचा ठेवाच, हा ठेवा जपण्यासाठी माणसाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. हाच विषय रंजकपणे मांडला आहे. प्रेक्षकांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा असे आवाहनही कलाकारांनी केले.